स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे आदर्श प्रमाण किती अ ८ ते १० ग्रॅम ब १२ ते १४ ग्रॅम क १४ ते १६ ग्रॅम?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 09:52

स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन हे १२ टक्के तर पुरुषांमध्ये इतके १३ टक्के इतके असणे आवश्‍यक असते. हे प्रमाण कमी झाल्यास त्वरित उपचार घेणे आवश्‍यक आहे.

शहरात पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता
शहरातील जवळपास पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून येत आहे. चुकीच्या आहारपद्धती, अतिश्रमाचे कामे, अनियमित आहार, व्रतवैकल्य करणे, पालेभाज्या कमी खाणे याकारणाने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन हे १२ टक्के तर पुरुषांमध्ये इतके १३ टक्के इतके असणे आवश्‍यक असते. हे प्रमाण कमी झाल्यास त्वरित उपचार घेणे आवश्‍यक आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होणे, गर्भाशयातील हार्मोन्स कमी-जास्त होणे, गर्भाशयातील गाठी यामुळे रक्तस्राव जास्त झाल्यामुळे देखील अशा समस्या उद्‌भवतात. तर काही वेळा कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खासकरुन कॉलेज तरुणी, कामगार महिलावर्ग श्रमाची कामे करणाऱ्या महिला यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. 

हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे 
धाप लागणे, धडधड वाढणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा येणे, शरीराच्या अवयवांचे दुखणे, कामात मन न लागणे, काम करण्याची इच्छा न होणे 
 
प्रतिक्रिया 
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. नियमित व पोष्टिक आहार घेणे यादृष्टीने लक्ष देणे काळाजी गरज आहे. विशेषतः त्या महिला ज्यांना अतिश्रमाची कामे करावी लागतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info